Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On Fadnavis : '' औरंगजेब जिवंत आणि फडणवीससाहेब, तो तुमच्याच पक्षात...'' ; ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

Shivsena Political News : '' शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का?''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील काही शहरांमध्ये औरंगजेबाच्या स्टेटसवरून दंगली घडल्या होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार असेल, तर त्याला सोडणार नाही असा इशारा दिला होता. आता शिवसेने( उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात संयुक्त मेळावा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी - शाह, फडणवीस यांच्यासह भाजपचा खरपूस समाचार घेतला. हे म्हणतात, औरंग्याची औलाद आहे. अरे कुठे आहे औरंग्या? मी असताना अशी दंगल झाली का? आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का? फडणवीससाहेब, तुमच्या पक्षात आहेत. औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे असेही ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर टोला लगावला. ते म्हणाले, सगळीकडे हे आयारामांना मुख्यमंत्री करत आहेत. यांनी घात शिवसेनेचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजाशी केला. हल्ली यांच्यात असे आहेत कपडे अंगावर नसले तरी चालतील असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही टोला लगावला.

हिंमत असेल मणिपूरच्या भगिनींकडून बांधून घ्या.

नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी आपल्या खासदारांना रक्षाबंधन मुस्लिम भगिनींकडून करून घ्या असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेल्या ताईंकडून पंतप्रधान मोदी राखी बांधून घेतली म्हणत शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींवर निशाणा साधला होता. तसेच पण हिंमत असेल तर मणिपूरच्या भगिनींकडून बांधून घ्या. जर राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानोकडून घ्या असा टोलाही उध्दव ठाकरेंनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. मी भाजपला आज आव्हान देतो, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा. जगातील सर्वात शक्तिमान नेता, विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जनआक्रोश करावा लागत आहे. मी भाजपची साथ सोडली, पण हिंदुत्व नाही सोडलं. 9 वर्षात शक्तिमान असलेला नेता असताना हिंदू खतरे मे है अशा घोषणा येत असतील तर काय उपयोग अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला खडे बोल सुनावले.

फडणवीस काय म्हणाले होते..?

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, “राज्यातील दंगलींची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. कारण, औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस अचानक अनेक जिल्ह्यांत समोर आले. हा योगायोग नाही, तर हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता. तो कधी होणार सुद्धा नाही. औरंगजेब हा आक्रंत होता.

या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. ए.पी.जे अब्दुल कलाम देशाचे हिरो होऊ शकतात. पण, औरंगजेब होऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मग, औरंगजेब आमचा हिरो होऊच शकत नाही असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT