Rahul Gandhi News : राहुल गांधी सोमवारी संसदेत परतणार? लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

Congress News : शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

monsoon session News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व बहाल करण्यासाठी कागदपत्रे तयार आहेत. आता फक्त लोकसभा अध्यक्षांची सही उरली आहे. सोमवारी लोकसभा अध्यक्ष त्यावर स्वाक्षरी करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. गुजरात न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा केली होती. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले होते.

मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर ज्या गतीने त्यांना अपात्र ठरवले. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. आता त्याच गतीने त्यांची खासदारकी परत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या (Congress) वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे करण्यात आली आहे. सभापतींनी लवकर कृती केली नाही, तर 'इंडिया' विरोधी आघाडीचे पक्ष हा मुद्दा संसदेत उपस्थित करू शकतात.

Rahul Gandhi News
Delhi Services Bill : दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत; काँग्रेस अन् 'आप'ने खासदारांना बजावला व्हिप

मोदी आडनावाबद्दल केलेल्या टिकेनंतर मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मे महिन्यात राहुल गांधींना (Rahul Gandhi) झाली होती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देताना म्हटले होते, ट्रायल कोर्टाने जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. अंतिम निकाल येईपर्यंत दोषी ठरवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची गरज आहे. अपात्रतेचा परिणाम केवळ व्यक्तीच्या अधिकारांवरच नाही तर मतदारांवरही होतो, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते.

Rahul Gandhi News
Delhi Service Bill : केजरीवालांची धडधड वाढली; दिल्ली प्रशासनावर हुकूमत कुणाची? सोमवारी होणार फैसला

दरम्यान, लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार मोहम्मद फैजल यांच्या बाबतीत सदस्य पुनर्स्थापनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना सदस्यता परत मिळण्यासाठी किती वेळ लागणार याकडे विरोधकांच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात सभागृहात येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते सभागृहात आले तर काय बोलणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com