Ayodhya Paul Ink Attack News : शिंदे गटाच्या आमदरांवर सडकून टिका करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Paul) च्यावर शाईफेक करण्यात आली. कळवा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक खासगी कार्यक्रमात शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर अयोध्या पौळ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
''मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी.'' अस ट्विट त्यांनी केलं आहे.
तसेच, एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
शुक्रवारी कळवा येथील जय भीम नगर परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी अयोध्या पौळ यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम सुरु असताना काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. यावेळी या महिलांनी मोठा गोंधळ घालत त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. त्या निघून जात असताना काही महिलांनी त्यांना मारहाणही केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यानकळवा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस महिलांनाचा शोध घेत आहेत.
बांगरावरील टीकेमुळे पौळ चर्चेत
राज्यातील सत्तांतरापासून अयोध्या पौळ शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टिका करताना दिसतात. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून त्या लक्ष्य करत आहेत. कळमनुरी बाजार समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष बांगर यांनी एक पण केला होता. ते म्हणाले होते की, "१७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही." मात्र त्यांना १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणता आल्या. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी बांगरांना लक्ष केले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.