Ayodhya Paul Ink Attack : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 'फायरब्रँड' नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक

Shivsena UBT News : कळव्यात पौळ यांना एका टोळक्याने घेरले होते
Ayodhya Paul
Ayodhya PaulSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Paul Ink Attack News : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे.

अयोध्या पौळ या वेळोवेळी ठाकरे गटाची बाजून जोरदारपणे मांडताना दिसतात. ठाकरे गटावर होणाऱ्या हल्ल्याला पौळ त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतात. गेल्या महिन्यात त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना धारेवर धरले होते. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना पौळ विविध मुद्द्यावरून अनेक प्रश्न विचारत असतात. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा शिवसेनेने (ठाकरे गट) निषेध व्यक्त केला आहे.

Ayodhya Paul
Vasantrao Kale Sugar Factory Election : 'सहकार शिरोमणी' कारखान्यासाठी ९३.९७ टक्के मतदान; काळे की पाटील कोण बाजी मारणार ?

अयोध्या पौळ या एका कार्यक्रमासाठी कळव्यात आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले. त्यानंतर त्यांच्यावर शाई फेकली. या घटनेने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Latest Marathi News)

बांगरावरील टीकेमुळे पौळ चर्चेत

कळमनुरी बाजार समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष बांगर यांनी एक पण केला होता. ते म्हणाले होते की, "१७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही." मात्र त्यांना १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणता आल्या. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी बांगरांना लक्ष केले होते.

Ayodhya Paul
PMC News : तब्बल २५ वर्षानंतर मिळाली मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई; काय आहे प्रकरण ?

पौळ म्हणाल्या होत्या की, "दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. आता कधी काढताय मिशी?"

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com