Azam Khan News, Samajwadi Party News, Uttar pradesh news  sarkarnama
मुंबई

सपाचे आमदार आझम खान २७ महिन्यानंतर "आझाद"

आझम खान यांच्या सुटकेनंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्वपूर्ण बदल होऊ शकतो.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party)रामपूर (उत्तरप्रदेश)चे आमदार आझम खान (Azam Khan) यांची तब्बल २७ महिन्यानंतर आज अखेर कारागृहातून सुटका झाली. त्यांना घेण्यासाठी त्यांची मुले अब्दुला आणि अदीब हे यावेळी कारागृहात आले होते. (Azam Khan latest Marathi news)

सुप्रीम कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला आहे. आझम खान यांच्या सुटकेनंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्वपूर्ण बदल होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

आझम खान यांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी रामपुरमध्ये स्वागत करण्यासाठी तयारी सुरु आहे. "आझम खान यांना न्याय मिळाला. हा आझम खान यांचा विजय आहे," असे टि्वट शिवपाल यादव यांनी केलं आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आझम खान यांचे स्वागत करीत टि्वट केलं आहे.

आझम यांची दोन मुले अब्दुल्ला आणि अदीब हे आज सकाळी सहा वाजल्यापासूनच तुरुंगाबाहेर पोहोचले होते.रामपूरमधील आझम समर्थक मोठ्या संख्येने रात्री उशिरा सीतापूर कारागृहात पोहोचले होते.तुरुंगाबाहेरही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तुरुंगाबाहेर आझम समर्थकांची गर्दी होती. शिवपाल यादवही सीतापूरला पोहोचले होते.

आझम खान पांढऱ्या रंगाच्या महाराष्ट्र क्रमांकाच्या इनोव्हा गाडीतून तुरुंगातून बाहेर पडले. आझम खान यांनी हात हलवत जमलेल्या समर्थकांना अभिवादन केले. त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. "आझम आमचे पार्टनर आहेत," असे शिवपाल यादव यांनी माध्यमांना सांगितले.

सुप्रीम कोर्टाने १७ मे रोजी रामपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात आझम खानच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी, उत्तर प्रदेश सरकारने आझम खानच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि त्यांना जमीन बळकावणारा आणि सवयीचा गुन्हेगार म्हणून संबोधले होते.

आझम खान यांना ट्रायल कोर्टातून आतापर्यंत 88 प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे. पण 89 व्या प्रकरणात जामिनासाठी खटला सुरू होणार होता. याआधी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने कलम-142 चा वापर करून त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

"आता ते बाहेर येऊ शकतात. परंतु त्यांना पुन्हा नियमित जामिनासाठी अर्ज करावा लागेल," असे न्यायालयानं म्हटलं आहे. त्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT