बीडीडी चाळीतल्या महिलेचा जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली व तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
Jitendra Awhad
Jitendra Awhad sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्याच्या बाहेर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jitendra Awhad latest news)

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रालयासमोर शिवगड बंगला आहे. याठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलसांनी दिली.

Jitendra Awhad
आव्हाड आणि केदार यांचा वाद असा रंगला की मुख्यमंत्री म्हणाले, `शोले`प्रमाणे टाॅस उडवू!

संबधीत महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली व तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वीच सतर्क पोलिसांनी तिला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Jitendra Awhad
नेम सोमय्या, दरेकरांवर; पण ACB च्या जाळ्यात अडकला दुसराच भाजप नेता

तृप्ती निवृत्ती कांबळे असं या महिलेचं नाव आहे. ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याची मााहिती समोर आली आहे. या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस करत आहे, असे सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com