baba siddiqui | Lawrence Bishnoi.jpg sarkarnama
मुंबई

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं घेतली? फेसबुक पोस्ट व्हायरल

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन जणांनी रेकी करून सिद्दी यांच्यावर हल्ला केला. यात सिद्दीकी यांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. यातच एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहेत. त्यात सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँग घेत असल्याचं म्हटलं आहे.

फेसबुकवर ‘शुब्बू लोणकर महाराष्ट्र’ नावानं असलेल्या अकाउंटवरून पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यात दाऊदला मदत केल्यामुळे सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच, आमच्या सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांनी हिशेब लिहून ठेवावा, असा इशाराही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आला आहे.  

फेसबुक पोस्टमध्ये काय?

ओम जय श्री राम.. जय भारत.. जीवनाचे मूल्य आम्हीला माहिती आहे. आम्ही शरीर आणि पैशाला धूळ समजतो. सलमान खानशी आम्हाला वैर नको होते. मात्र, सलमान खानने आमच्या भाईचे नुकसान केले. आज बाबा सिद्दीकीबाबत गोडवे गायले जात आहेत. मात्र, एकेकाळी दाऊतसोबत सिद्दीकींवर  मोक्काच्या गुन्हा दाखल होता. अनूज थापन आणि दाऊदला बॉलीवूड, राजकारण, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराशी जोडणे, हे सिद्दीकीच्या हत्येचं कारण आहे.

Lawrence Bishnoi Gang Claims Responsibility For Murder

आमची कोणाशीही दुश्मनी नाही. पण, जे सलमान खान आणि दाऊदच्या गँगला मदत करतात, त्यांनी आपला हिशेब लिहून ठेवावा. आमच्या कुठल्याही भाईला मारलं, तर उत्तर मिळणारच. आम्ही कधीही पहिल्यांदा वार केला नाही. जय श्री राम... जय भारत... #Lawrencebishnoi #anmolbishnoi #ankitbhadusherewala

दरम्यान, फेसबुक पोस्ट करणारा कोण आहे? पोस्ट खरी की खोटी? याचा तपास पोलिस घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT