Riteish Deshmukh On baba siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखला बसला धक्का; म्हणाला, गुन्हेगारांना...

baba Siddique : बाबा सिद्दीकी आणि बॉलीबूड हे नातं खूप जून आहे. बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला बॉलीवूडमधील सिनेतारके हजेरी लावायचे.
riteish deshmukh | baba siddiqui
riteish deshmukh | baba siddiquisarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर राजकीय आणि बॉलीवूड क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना बॉलीवूड अभिनेता, रितेश देशमुख याने गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पश्चिम कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 राउंड फायर केले. यात सिद्दीकी यांना 4 गोळ्या लागल्या. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

सिद्दीकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखला एकच धक्का बसला आहे. ट्विट करत रितेश म्हणाला, “बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी कळताच मला धक्का बसला. मला अत्यंत दु:ख होत आहे. झिशान सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुख:त मी सहभागी आहे. या हत्येमागे असलेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी.”

riteish deshmukh | baba siddiqui
Baba Siddique : 25 दिवसांपासून रेकी, दबा धरून बसलेले अन् झाडल्या गोळ्या; सिद्दीकींच्या हत्येमागील आरोपींची नावे अन् फोटो समोर

सिनेसृष्टीची रूग्णालयात धाव...

सिद्दीकी आणि बॉलीवूड हे नातं खूप जुनं आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच अभिनेता संजय दत्त, सलमान खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी रूग्णालयाला भेट दिली.

दोघांना अटक एकजण फरार...

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेतलं आहे. एक आरोपी फरार झाला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणात रवाना झाले आहे. तीनमधील दोघांची नावे करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप, अशी आहेत. करनैल सिंह हरियाणा आणि धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com