Mumbai News : माजी मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अपेक्षित वेगात पोलिसांचा तपास सुरू नसल्याचा गंभीर आरोप माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला होता. आता याचदरम्यान,बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी थेट कॅनडातून मोठी अपडेट समोर आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडात पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. अख्तरला कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या अटकेनंतर सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कॅनडा पोलिसांनी आरोपी झिशान अख्तर हा कॅनडात पळून गेला होता. बोगस पासपोर्टच्या आधारे त्याने थेट कॅनडा गाठले होते. पण आता कॅनडा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर येत आहे. आता झिशान अख्तरला पुन्हा एकदा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) झिशान अख्तरचा शोध सुरू होता. मात्र, आता तो कॅनडात लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून जोरदार हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. अख्तरच्या चौकशीत बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणामागचा मास्टरमाईंड पोहोचता येणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात 13 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी काही अज्ञात तीन लोकांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात सिद्दिकी जखमी झाले. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र,गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण आणि चित्रपटसृष्टी हादरली होती. सिद्दिकी यांचे बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांशी जवळचे संबंध होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.