Baba Siddique Shot Dead Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे काय आहे पुणे कनेक्शन

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: माजी मंत्री, अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल (शनिवारी) दोन जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. हत्येत सहभागी असलेल्या तिसरा आरोपीचे नाव समोर आले आहे. या प्रकरणातील नवनवे खुलासे आता समोर येत आहेत

बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. या तिन्ही आरोपींना पुण्यातून बोलावण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस या बाजूने तपास केला आहे.

बाबा सिद्दीकीयांच्या हत्येत सामील आरोपी हे जेलमध्ये होते त्याठिकाणी त्यांची बिष्णोई गँगच्या एका शूटरशी ओळख झाली. हे तीनही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सहभागी झाले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी त्यांना अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.

करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी दोघा आरोपींची नावे आहेत. करनैल सिंह हरियाणा आणि धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. तिसरा आरोपीचे नाव शिवकुमार उर्फे शिव असे असून तो उत्तर प्रदेशातील आहे. तो काही काळ पुण्यात वास्तव्यास होता, त्यांचा स्क्रॅबचा व्यवसाय होता, असे तपासात आढळले आहे. हे तिघेही पुण्यातून मुंबईत आले असल्याचे समजते.

या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कामासाठी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले होते. ते महिनाभरापासून कुर्ल्यात भाड्याच्या खोलीने राहत होते. बाबा सिद्दीकी यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची त्यांनी रेकी केली होती.

बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर करीत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तू आमच्या भाईचं आज नुकसान केलं आहे. आज जे बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान गात आहेत एकेकाळी दाऊद प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होता. सिद्दिकीयांच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं…'असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT