Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट: हत्येसाठी मिळाली होती ॲडव्हान्स रक्कम; बंदूक कुठून मिळाली?

Baba Siddique killing LIVE updates bishnoi gang connection:हत्येसाठी त्यांनी अँडव्हान्स रक्कम देण्यात आली होती, ती रक्कम किती होती, याची माहिती समजलेली नाही. हत्येसाठी दसऱ्याच्या दिवस त्यांनी कसा निवडला याबाबतचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.
 Baba Siddique Shot Dead
Baba Siddique Shot DeadSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्याप्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले दोघेही आरोपी दोन महिन्यांपासून मुंबई परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. हत्या करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कार्यालयाताची रेकी केल्याची दोघा आरोपींनी कबुली दिली आहे.

काही दिवसापूर्वी त्यांना एका आर्म्स डीलरने कुरिअर एजंटच्या मदतीने बंदूक पाठवली होती. या बंदुकीसाठी पहिलेच व्यवहार झाला होता. हत्येसाठी त्यांना अँडव्हान्स रक्कम देण्यात आली होती, ती रक्कम किती होती, याची माहिती समजलेली नाही.

हत्येसाठी दसऱ्याच्या दिवस त्यांनी कसा निवडला याबाबतचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र ईशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे चार पथक रवाना झाले आहेत.

 Baba Siddique Shot Dead
Ajit Pawar On Baba Siddique Shot Dead: सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना गुन्हे शाखेच्या युनीट तीन परेल येथे नेले होते. सध्या या प्रकरणाचा जॉईंट सीपी गुन्हे शाखा लक्ष्मी गौतम आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती अधिक तपास करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांचा बॅालीवूडसोबत निकटचा संबध होता. त्यांच्या निधनानंतर अभिनेता सलमान खान, संजय दत्त, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com