Eknath Shinde latest news sarkarnama
मुंबई

Bacchu Kadu : बच्चू कडू अन् राणांमधील धुसफूस शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मिटणार का?

Eknath Shinde : बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. यावरुन दोन्ही आमदारांमध्ये जुंपली आहे.

सरकारनामा ब्युरो

Eknath Shinde: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (eknath shinde)स्थापन झाल्यावर सर्व काही सुरळीत सुरु असेल तर वाटलं होतं. पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अलबेल असल्याचं दिसून येत नाही. सरकारमधील आमदारांची धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहेत. (eknath shinde latest news)

गुवाहाटीवरुन झालेल्या आरोपांमुळे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा वाद आता शिंदे-फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. त्यावर काय निर्णय होईल, हे लवकरच समजेल.

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. यावरुन दोन्ही आमदारांमध्ये जुंपली आहे.

या आरोपांवरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही दाखल केला आहे. रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार असल्याचे समजते.कडू आणि राणा यांना या दोघांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळी झाल्यावर लवकरच बच्चू कडू, रवी राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे-फडणवीस या दोन आमदारांचे भांडण मिटवणार का, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT