Eknath Shinde : तीन महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकली ; विरोधकांना टोला, मुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटींग

Eknath Shinde : मेलबर्नच्या स्टेडियममध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकळी, कालची मॅच जिंकली.
Uddhav Thackray, Eknath Shinde
Uddhav Thackray, Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde : टी20 विश्वचषकातील रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच रंगला आहे. यात भारताने दमदार विजय मिळवला.टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर भारतभर मोठा आनंद पाहायला मिळाला.अनेकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. या विजयाने भारतीयांची दिवाळी गोड झाली आहे. (Eknath Shinde latest news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. भारत- पाक मॅचचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत जोरदार बॅटींग केली. "तीन महिन्यापूर्वी भारत-पाक मॅचप्रमाणे आम्हीही मॅच जिंकली, ती या महाराष्ट्राने पाहिली, देशाने पाहिली आणि जगाने पाहिली," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

Uddhav Thackray, Eknath Shinde
Deepak Kesarkar : म्हणूनच 50 आमदार फुटले ! ; ठाकरेंना केसरकरांचे प्रत्युत्तर

"लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्याची दखल सर्वांनी घेतली. म्हणून आम्ही आल्या आल्या आपली परंपरा, संस्कृती आणि सण उत्सावांच्या माध्यमातून एक मोकळा श्वास घेऊन रस्त्यावर उतरली,"असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, "काल आपण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकली, त्याचा आनंद सगळीकडे साजरा झाला. आपण पाहिलं की माहित नाही, पण मेलबर्नच्या स्टेडियममध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकळी, कालची मॅच जिंकली,"

आपल्या टि्वटमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, "उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी... लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा...दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com