Sachin Tendulkar Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu Vs Sachin Tendulkar : सचिनच्या घराबाहेर बच्चू कडूंची 'बॅटिंग'; कार्यकर्त्यांसह आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात !

Bachchu Kadu Protest Against Sachin Tendulkar : तेंडुलकरांनी या जाहीरातींमधून माघार घेतली नाही तर...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले होते. सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंग जाहीराती विरोधात त्यांनी आंदोलन पुकारले होते. बच्चू कडू यांना आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. कडू यांनी तेंडुलकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. (Latest Marathi News)

तेंडुलकरांनी या जाहीरातींमधून माघार घेतली नाही तर त्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी केला होता. त्यानुसार आज प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेंडुलकर यांच्या घराबाहेर जमले होते. मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Bachchu Kadu News)

"या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून भारतरत्न सचिनने बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. तसे नाही झाले तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल," असा इशारा यापूर्वीच कडू यांनी दिला होता.

आंदोलनकर्ते वेळी बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन केले जाणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशाचा ते अभिमान आहेत. म्हणून त्यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी. सचिन हे भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केलं नसतं, माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती. पण त्यांनी माघार न घेतल्याने त्यांच्या घरासमोरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे," असे कडू म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT