NCP Crisis News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या गटातील भुजबळ निशाण्यावर ?

Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal: शरद पवारांवर केलेल्या टिकेमुळे भुजबळांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
Sharad Pawar and Chhagan Bhujbal
Sharad Pawar and Chhagan BhujbalSarkarnama

Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांच्या गटाकडून अजितदादांच्या गटातील मंत्री छगन भुजबळ हे निशाण्यावर असल्याचे गेल्या दोन महिन्यांमधील घटनांवरुन दिसून येत आहे. यातच भुजबळांच्या वक्तव्यामळे उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे चित्र आहे.

अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचवेळी भुजबळांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भुजबळांबद्दल शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "भुजबळ हे तिकडे काय सुरू आहे, हे पाहून येतो असे सांगून गेले. मात्र, तिकडे जाऊन त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली".

Sharad Pawar and Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray News : सरकार 'गॅसवर असल्यानेच सिलिंडरच्या किमती कमी केल्या ; ठाकरेंचा हल्लाबोल

पक्षातील फुटीनंतर पवारांनी पहिली सभा येवल्यात घेत भुजबळांना आव्हान दिले. या सभेमुळे भुजबळांचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. असे असतानाच भुजबळांनी एका कार्यक्रमात बोलताना ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज भुजबळांच्या विरोधात आक्रमक होत भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती.

हा वाद मिटत नाही तोच भुजबळांनी तेलगी प्रकरणावर फुंकर मारत स्वत:लाच ‘चटका’ दिला. बीडच्या सभेत बोलताना आपला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणावर पवारांनी आपला राजीनामा घेतला. त्यांनी पवारांवर टीका करताच सभेतील लोकांनी गोंधळ केल्याने भुजबळांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. इतकेच नाही तर पवारांवर केलेल्या टिकेमुळे भुजबळांना लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर विरोधकांना भुजबळांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आयते कोलित मिळाले.

Sharad Pawar and Chhagan Bhujbal
Sharad Pawar On India Meeting: 'इंडिया' च्या दोन दिवसांच्या बैठकीत काय चर्चा होणार ? शरद पवारांनी थेट अजेंडाच सांगितला

यानंतर शरद पवारांनी भुजबळांना प्रत्युत्तर देत "तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुगांत गेले असते", असे विधान करत भुजबळांना ‘टार्गेट’ केले. एकंदरीत गेल्या दोन महिन्यातील राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतरच्या घडामोडी पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळ निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com