akshay shinde.jpg sarkarnama
मुंबई

VIDEO : 'एन्काऊंटर'वरून अक्षय शिंदेच्या आईचा पोलिसांवर संताप, संशय अन् प्रश्नांची सरबत्ती

Akshay Shinde Dead News : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटवरमध्ये मृत्यू झाला. यानंतर अक्षयच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Akshay Sabale

बदलापूर येथील एका नामंकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी 'एन्काऊंटर' केला. दुसऱ्या एका गुन्ह्याप्रकरणी अक्षयला तळोजा कारागृहातून घेऊन येताना त्यानं पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जागीच ठार झाला. मात्र, अक्षयच्या 'एन्काऊंटर'वर आईनं संताप व्यक्त केला आहे.

माझ्या मुलाला कशासाठी मारलं? मुलानं कधी फटाकडी वाजवली नाही. त्याला गाडी चालवता येत नाही. मग, त्याला पिस्तूल कशी पकडता येणार? असा सवाल अक्षयच्या आईनं उपस्थित केला आहे. तसेच, काहीतरी करून अक्षयला मारून टाकलं, असा संशयही अक्षयच्या व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अक्षयची आई म्हणाली, "पोलिसांनी माझ्या मुलाला मारून टाकलं आहे. कुणी काहीतरी करून अक्षयला मारून टाकलं. 'माझा मुलगा बोलला, मला केव्हा सोडविणार आहात तुम्ही...' त्यावर बोलले एका महिना थांब वकीलाला बोलून सोडवेल."

"प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मग, कशासाठी माझ्या मुलाला मारलं? मुलानं कधी फटाकडी वाजवली नाही. गाडी चालवता येत नाही. त्याला बंदूक कसं पकडता येणार? पोलिसांना कुणीतरी पैसे दिले असतील. त्याला गोळ्या मारल्या. दबावात त्याच्याकडून गुन्हा कबूल करण्यात आला," असा आरोप अक्षयच्या आईनं केला आहे.

फेक एन्काऊंटर नाही...

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षयचा 'फेक एन्काऊंटर' झाला नसल्याची म्हटलं आहे. "बदलापूर अत्याचाराची घटना घडली, तेव्हा विरोधी पक्ष आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. त्यामुळे ही घटना फेक एन्काऊंटर झालेली नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT