CM Shinde News : आरोपी अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर'; पोलिसांच्या कारवाईवर संशय; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं

Akshay Shinde Encounter News : बदलापूर प्रकरणात पोलिसांनी जी काही कारवाई केली, त्याचा तपास होईल आणि खऱ्या गोष्टी समोर येतील. पण एक नक्की आहे की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवली आहे, ते बिथरले आहेत. त्यांना पराभव दिसतोय म्हणून हे उलट सुलट आरोप सुरू आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
CM on Badlapur .jpg
CM on Badlapur .jpgSarkarnama
Published on
Updated on

Badlapur News : बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी (ता.23) संध्याकाळी ठाण्यातील मुंब्रा बायपास या ठिकाणी पोलिस आणि अक्षय यांच्यात झटापट झाली.यामध्ये अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर तीन राऊंड फायर केले. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये अक्षयचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे. ही घटना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली आहे.

या प्रकरणी आता राजकीय आरोप- प्रत्यारोप होऊ लागल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत असतानाच पोलिसांच्या या कारवाईवरही संशय आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,बदलापूर दुर्घटनेमधला आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना ही घटना घडली. पहिल्या पत्नीने देखील त्याच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. अशा गुन्हेगाराला तपासाकामी आणले जात असताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांची बंदूक हिसकावली.

यानंतर शिंदेने केलेल्या फायरिंगमध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.इतर पोलीस देखील जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे.स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला.त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे.या घटनेचा पोलीस तपास सुरू असल्याचेही CM शिंदेंनी म्हटलं आहे.

CM on Badlapur .jpg
Laxman Hake : संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके भडकले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी बदलापूर एन्काऊंटर (Badlapur Encounter) प्रकरणी महायुती सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांना फटकारलं आहे. ते म्हणाले, सुरुवातीला विरोधक फाशीची मागणी करत होती आता विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर हे दुर्दैवी आहे.अशाप्रकारचे आरोपीची बाजू घेणे निंदाजनक आहे, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

पोलीस जखमी आहे, त्याचं विरोधीपक्षाला काही देणं घेणं नाही.पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. सणवाराला रस्त्यावर उन्हात-पावसात उभे असतात. कुटुंबापासून लांब राहतात अशा पोलिसांबद्दल आक्षेप घेणे प्रश्नचिन्ह निर्माण करणे दुर्दैवी आहे असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केले.

बदलापूर प्रकरणात पोलिसांनी जी काही कारवाई केली, त्याचा तपास होईल आणि खऱ्या गोष्टी समोर येतील. पण एक नक्की आहे की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवली आहे, ते बिथरले आहेत. त्यांना पराभव दिसतोय म्हणून हे उलट सुलट आरोप सुरू आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

CM on Badlapur .jpg
Devendra Fadnavis On Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'पोलिसांनी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com