Badlapur Protest  sarkarnama
मुंबई

Badlapur School Case : बदलापूर पेटलं! आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

Badlapur Crime News : संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आहे. यावेळी पोलिस जीव मुठीत धरून पळून गेल्याचं पाहायला मिळालं.

Akshay Sabale

Badlapur News Today Marathi : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना समोर आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. मंगळवारी सकाळपासून नागरिकांनी शाळेला घेराव घातला आहे.

तर, बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केलं आहे. या रेल रोको आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलिस जीव मुठीत धरून पळाले...

मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसह निषेध करण्यासाठी पालकांनी सकाळपासून बदलापूर रेल रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यातच हे आंदोलन चिघळलं. संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आहे. यावेळी पोलिस जीव मुठीत धरून पळून गेल्याचं पाहायला मिळालं.

शाळेची नासधूस

आंदोलनकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडूनही लाठीचार्ज करण्यात आला. यात दगडफेकीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे संतप्त जमावाने शाळेचं गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जमावाकडून शाळेची नासधूस करण्यात आली आहे.

मुख्याध्यापिका, शिक्षिका अन् दोन सेविकांचे निलंबन

सात दिवसांपूर्वी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनानं शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन करण्यात आलं आहे.

सर्व शाळांमध्ये विखाशा समिती स्थापन

दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यावर बदलापूर येथे उद्रेक उसळला. यानंतर सरकारला जाग आली आहे. "आता कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील," अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

याप्रकरणी तक्रार करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितलं. याप्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही चालू अवस्थेत नसल्याचे आढळले आहे. त्यावरही कारवाई होईल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT