Baijayant Panda, the newly appointed BJP Maharashtra in-charge, has stressed the importance of respecting senior party leaders amid growing internal tensions. Sarkarnama
मुंबई

BJP Maharashtra : भाजपमध्ये जुन्या फळीतील नेत्यांना 'अच्छे दिन' येणार; दिल्लीतून पाठवलेल्या नेत्याने दिले महत्त्वाचे संकेत

Baijayant Panda on BJP Maharashtra : एकीकडे उमेदवारीवरून पक्षात नाराजी असताना दुसरीकडे जुन्या नेत्यांना सन्मान देण्याची भूमिका बैजयंत पांडा यांनी मांडली आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Oct : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून भाजपमधील अंतर्गत बंडखोरी आणि नाराजी समोर आली आहे. अशातच भाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी बैजयंत पांडा यांनी मुंबईतील एका बैठकीत मोठं वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षातील जुन्या फळीतील नेत्यांचे अच्छे दिन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून बैजयंत पांडा पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी पक्षाच्या बैठकीत त्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला.

'मी कोणत्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल, तेव्हा पक्षाचे जुने पदाधिकारी आणि अनुभवी नेते यांच्याशी माझी भेट होईल, याची व्यवस्था करा. जुन्यांना सन्मान दिलाच गेला पाहिजे,' असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पांडा यांच्या या वक्तव्याचे पक्षांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही काळात भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला जात असताना आता जुन्या पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेण्याची भूमिका पक्षाच्या नव्या नेतृत्वाकडून मांडली जात आहे. त्यामुळे आगामी काळात जुन्या नेत्यांशी संवाद वाढवून त्यांची मते आणि सूचना जाणून घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून अनिल सोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठका घेणार आहेत.

एकीकडे उमेदवारीवरून पक्षात नाराजी असताना दुसरीकडे जुन्या नेत्यांना सन्मान देण्याची भूमिका बैजयंत पांडा यांनी मांडली आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT