Balasaheb Ajbe
Balasaheb Ajbe Sarkarnama
मुंबई

बाळासाहेब आजबेंनी थोपटला विधानसभेत दंड

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्याच्या विधानसभेत सध्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. यात भाजप-शिंदे गटाच्या राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली ते विजयी झाले आहेत. या मतदान प्रक्रिये दरम्यान आष्टी ( जि. बीड ) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे ( Balasaheb Ajbe ) यांनी भाजप व शिंदे गटाकडे पाहून दंड थोपटला. Assembly Speaker Election News Update

विधानसभा अध्यक्ष पदाची निवड नुकतीच झाली. या निवडी दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजप व शिंदे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी प्रत्येक आमदाराने प्रस्तावच्या बाजूने अथवा विरोधात जाहीरपणे मतदान करायचे होते. सुरवातीला प्रस्तावाच्या बाजूने मतदान घेण्यात आले. यात नार्वेकर यांना 164 मते मिळाली. त्याच वेळी नार्वेकर विजयी झाले हे निश्चित झाले होते.

प्रस्तावाच्या विरोधात मतदान प्रक्रिया सुरू झाली. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिले मतदान केले. 50 वे मतदान अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर 100 वे मतदान देण्याची संधी आष्टीचे आमदार आजबे यांना मिळाली. त्यांनी आपले नाव सांगतानाच भाजप व शिंदे गटाकडे पाहून दंड थोपटला. त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकला.

बीड जिल्ह्याचे दंड थोपटणे

बीड जिल्ह्यातील आमदाराने विधानसभेत दंड थोपटण्याची ही पहिली वेळ नाही. या पूर्वी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही विधानसभेत भाजप नेत्यांकडे पाहून दंड थोपटला होता. हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. एका वर्षांच्या आतच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी भाजप नेत्यांकडे पाहून दंड थोपटले. हे दोन्ही नेते पूर्वी भाजपमध्येच होते. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT