'हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा विजय!'

Eknath Shinde Latest Marathi News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिंदे म्हणाले, ''हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!'' असल्याचे शिंदे यांनी म्हणटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे (Shivsena) गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

Eknath Shinde
बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या अपात्रेतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आता मुदतवाढ दिल्याने एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde
आषाढीची पूजा कोण करणार, ठाकरे की फडणवीस? न्यायालयाच्या आदेशानंतर वाढली अनिश्चितता

एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि विधानसभा उपाध्यक्ष, शिवसेनेच्या वकिलांमध्ये मोठा युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com