Mumbai News : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता व्यक्त करताना,त्यांनी थेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेल्या राहुल गांधींनाच टार्गेट केलं होतं. आता भाच्याच्या याच टीकेवर 'मामा'व काँग्रेसचे मुरब्बी नेते बाळासाहेब थोरात यांनी मोजक्याच आणि कान टोचत प्रत्युत्तर दिले आहेत.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सोमवारी(ता.जून) नाशिक पदवीधर तदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना 'बालिश'पणाची उपमा देत फटकारलं आहे. यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांचं बोलणं अजूनही बालिश आहेत.त्यांनी जरा विचार करून बोलावं असा कानउघडणी वजा सल्ला दिला आहे.
थोरात म्हणाले,सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) बोलले हे खरं आहे. एकतर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे, ते ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. नका बोलू तुम्ही पण तुम्ही ते ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. सत्यजीतच्या राजकीय वाटचालीत काँग्रेसचं योगदान सत्यजीतसाठी खूप चांगलं राहिलं आहे. काँग्रेसनं देखील सत्यजीतसाठी खूप काही केलं आहे.पण त्यांचं बोलणं अजूनही बालिश आहेत.त्यांनी जरा विचार करून बोलावं,अशा शब्दांत त्यांनी कान टोचले.
ते आता स्वतंत्र आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांनी त्यांची विचारांची मांडणी नक्कीच करायला हरकत नाही. पण कुठे काय बोलावं आणि काय नाही हे शिकलं पाहिजे, असे अनुभवाचे बोलही बाळासाहेब थोरात यांनी भाचे सत्यजीत तांबेंना सुनावले. राहुल गांधी अॅक्सेसेबलच नाहीत, असे सांगताच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासांत भेट घेऊन दाखवावी, असं चॅलेंज दिलं होतं.
काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्याच थोरातांनी सत्यजीत तांबेंना खडेबोल सुनावतानाच महायुती सरकारवरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, आपण अनेक पावसाळे यापूर्वी पाहिलेले आहेत.पण मान्सून पुर्व पाऊस एवढा कधी झाला नव्हता.शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे.पंचनामे काय करणार ? प्रशासन दिसत नाही ,पालकमंत्री दिसत नाही. काही ठिकाणी पालकमंत्री नसल्याची टीका केली.
तसेच बाळासाहेब थोरातांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकरी यांच्यात मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. याला सरकार जबाबदार असेल असंही विधान केलं. याचवेळी त्यांनी कृषीमंत्री हे आमचे शेजारी आहेत, पण त्यांनी थोडं संवेदनशील असलं पाहिजे. आपण सत्तेत आहात. सर्वात काळ कृषी मंत्री मी राहिलो आहे. शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते. फक्त प्रामाणिक काम करावं लागतं, असा टोलाही त्यांनी नाव न घेता महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना लगावला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता व्यक्त करताना, राहुल गांधींना टार्गेट केलं होते. राहुल गांधी अॅक्सेसेबलच नाहीत, असे सांगताच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासांत भेट घेऊन दाखवावी, असं चॅलेंज दिलं होतं.
आमदार तांबे यांच्या या चॅलेंजमुळे राज्यातील काँग्रेसला (Congress) एकप्रकारे आव्हान होते. याशिवाय, काँग्रेसच्या 'NSUI' या संघटनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली. गेल्या 15 वर्षांपासून एकच अध्यक्ष असून, ही संघटना कुठेही दिसत नाही, असा टोला देखील आमदार तांबेंनी लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.