
Pune News : अचानक आलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं देखील नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सरकारकडून सध्या पंचनामाचे काम सुरू असले तरी नुकसान भरपाई कधी आणि किती मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अशातच आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये कपात करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका सरकारी जिअरच्या अनुषंगाने केला आहे.
कर्जत -जामखेड मतदारसंंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोमवारी (ता.2 जून) सोशल मीडियावर हा जीआर पोस्ट केला आहे. ते म्हणाले, राज्य सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिका म्हणजे ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच झाली आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना मतांवर डोळा ठेवून निर्णय घेणारं महायुती सरकार आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे निर्णय घेत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी 1 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाने शेतकऱ्यांना अवकाळीमुळे होणारी नुकसानभरपाई देताना त्यात प्रति हेक्टरी जिराईतसाठी 8500 वरून 13,600 पर्यंत वाढ केली तर बागायतीसाठी 17,000 रुपयांवरुन 27,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती.
त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये विधासभा निवडणुका सरताच आणि सत्तेवर येताच महायुती सरकारची (Mahayuti) गरजही सरली. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी 30 मे 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयात शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत पुन्हा 2023 सालच्या निकषाप्रमाणे कपात केली आहे.
म्हणजेच जिरायतीसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टरी ऐवजी आता केवळ 8,500 रुपये तर बागायतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरऐवजी १७००० रुपये मिळणार आहेत. शिवाय मदतीची मर्यादाही 3 हेक्टरवरुन 2 हेक्टर करण्यात आली. यावरून शासन शेतकऱ्यांना केवळ ‘वापरा आणि वाऱ्यावर सोडून द्या’ अशाप्रकारे वागवत असल्याचं दिसून येतं.
आज रोजी राज्यात सध्या तब्बल 55 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं, अशा परिस्थितीत या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून 1 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसारच शेतकऱ्यांना मदत करुन दिलासा द्यावा रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.