Shinde-Thackeray Politics : Sarkarnama
मुंबई

Teaser of Shinde's Shivsena : बाळासाहेबांचं जुनं भाषण अन् शिंदेंचं टायमिंग, उद्धव ठाकरे टार्गेट

अनुराधा धावडे

Mumbai Political News : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाला दिवसागणिक धार चढत असतानाच, या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरनेही राजकारण तापले आहे. या मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवून दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवणार आहेत. अशातच, शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने टीझरमधूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर बाण सोडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची कॅसेट वाजवून शिंदेंनी ठाकरेंविरोधात हिंदुत्वाचे कार्ड उपसणार असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे शिंदेंच्या टीझरचीही चर्चा रंगली आहे. त्यातून दसरा मेळाव्यातून दोन्ही बाजूंच्या तोफा धडाडणार असल्याचे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांच्या भाषणाची कॅसेट अन...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यानिमित्त नेहमीप्रमाणे टीझर लाँच केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही शब्दांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. 'गांडूंची औलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल, पण या मर्दाला टक्कर देण्याची कोणी हिंमत करता कामा नये , असे दृश्य साऱ्या हिंदुस्तानात उभे राहिले पाहिजे.' या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तसेच, 'शिवसेनेचं एकच तत्त्व, साहेबांचे हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा. मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी, सायंकाळी ५ वाजता, आझाद मैदान,'' असे आवाहन करत एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे. नेहमीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंचा आवाजही या टीझरला देण्यात आला आहे.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याची पंरपरा सुरू ठेवली, पण गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली आणि दसरा मेळाव्यातही. शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे-शिंदेमध्ये झालेला संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. दोन्ही गटांचा संघर्ष अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहाेचला. यावर्षीही असा संघर्ष होईल, अशी चिन्हे निर्माण झाली. पण एकनाथ शिंदेंनी माघार घेत या संघर्षाला पूर्णविराम दिला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT