Operation Lotus : कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्‌स’; भाजपकडून काँग्रेस आमदारांना मोठ्या ऑफर, ‘डीकें’ची कबुली

Karnataka News : ‘ऑपरेशन लोट्‌स’साठी आमदारांना काय ऑफर दिली जात आहे. याबाबतची सर्वकाही माहिती आमच्याकडे आलेली आहे.
Karnataka News
Karnataka NewsSarkarnama
Published on
Updated on

Bangalore News : कर्नाटकातील काँग्रेस सरकार लवकरच पडणार, असे भाजपकडून पहिल्या दिवसापासून सांगितले जात आहे. तशा हालचालीही होत असल्याचे आता उघड होत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तशी जाहीर कबुलीच दिली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा भाजपने कट रचला असून, भाजपची एक टीम आमच्या काही आमदारांना भेटत आहे, असा गौप्यस्फोटही शिवकुमार यांनी केला आहे. (Operation Lotus again in Karnataka; Big offers from BJP to Congress MLAs)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी बंगळूरमधील सदाशिवनगर येथे पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन लोट्‌सची माहिती दिली. भाजपकडून काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी कट रचण्यात आलेला आहे. त्याची पूर्ण कल्पना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला आहे, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karnataka News
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचा गर्भित इशारा; ‘अजून खूप गोष्टी आहेत, त्या आजच सांगणार नाही’

भारतीय जनता पक्षाची टीम कोणत्या आमदारांना भेटत आहे. ‘ऑपेरशन लोट्‌स’साठी आमदारांना काय ऑफर दिली जात आहे. याबाबतची सर्वकाही माहिती आमच्याकडे आलेली आहे. या प्रत्येक घडामोडीची माहिती माझ्याकडे आहे. विधानसभेचे अधिवेशन झाल्यानंतर भाजपच्या कोणत्या टीमने कोणत्या आमदाराशी चर्चा केली, हे आमदारच समोर येऊन सांगतील.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि भाजप आमदार रमेश जोरकीहोळी यांची नुकतीच भेट झाली आहे. त्यावर डीके यांनी प्रकाश टाकला. प्रत्येक गोष्टींवर शंका घेणे योग्य नसते. माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे त्या भेटीबाबत मी जास्त काही बोलणार नाही.

Karnataka News
Fadnavis Big Announcement : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय; कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द

मुळात जारकीहोळी आणि शेट्टर यांच्यात वैयक्तिक स्वरूपाची भेट झालेली आहे. काँग्रेस पक्षात रमेश जारकीहोळी यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आणि इतर नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत हायकमांड निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकात बुडते जहाज म्हणून भाजपकडे बघितले जाते. ते विधानसभा निवडणुकीच्या वेळीच बुडाले आहे. त्यांच्याकडे आता काय उरले आहे. भाजपला ‘ऑपरेशन लोटस’साठी आणखी ६५ आमदारांची आवश्यकता आहे. इतके आमदार भाजप कुठून आणणार? भाजपची अवस्था ‘ऑपरेशन लोट्‌स’नंतर काय झाली, हे सर्व राज्याने पाहिले आहे, या शब्दांत अवजड व मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची खिल्ली उडवली.

Karnataka News
Devendra Fadnavis Contract Recruitment : कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचा, फडणवीसांनी विरोधकांना उघडं पाडलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com