मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून परिणामी शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, अशा दोन शिवसेना अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात तयार झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका होत आहे. शिंदे गटाला मिळालेल्या बाळासाबेबांची शिवसेना या नावावरून शिवसेना नेत्या आणि मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. (Kishori Pednekar & Eknath Shinde Latest News)
बाळासाहेब खूप आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव आहेत. त्यामुळे शिंदे गटाची शिवसेना नेमकी कुठल्या बाळासाहेबांची आहे? विखे पाटीलांची, थोरातांची, शिर्के की निंबाळकरांची, अशी खोचक विचारणा सोशल मीडियात होत असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ठाकरे नाव आल्याशिवाय बाळासाहेब नाव परिपूर्ण होतच नाही. त्यामुळे ती शिवसेना कुणाची, असे उत्तर त्यांना द्यावं लागेल. आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल आहे, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जी मशाल आहे. ती धगधगती आहे. नियतीने उत्तर दिल्यावर सगळे स्तब्ध होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जो नतमस्तक होतो त्याने धगधगती मशाल ह्दयात कायम ठेवणार आहेत, अशा शब्दात त्यांनी आपले उत्तर दिले.
तसेच शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावे आणि चिन्ह पाठवली. त्यात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि चिन्ह 'मशाल' हे निवडणूक आयोगाने दिली. मात्र शिवसैनिकांच्या मनाला उभारी देणारी नाव आणि चिन्ह आम्हाला मिळाल्याचं पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.