मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना,अशा दोन शिवसेना अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात तयार झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका होत आहे. दरम्यान, आता मनसेनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील मुंबई पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आसून त्यासाठी आज (ता.११ऑक्टोबर) मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. तसेच या बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब आणि राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक पराभव बघितले. मात्र, ते कधी रडले नाहीत, अशा शब्दात त्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका त्यांच्यावर टीका केली आहे. (Uddhav thackeray, sandeep deshpande)
देशपांडे म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह गेलं म्हणून उद्धव ठाकरेंचे डोळे पाणावले असे भास्कर जाधव म्हणाले. मात्र बाळासाहेब आणि राज ठाकरेंनी अनेक पराभव पाहिले आहेत. मात्र ते कधी रडले नाही. सेनेला सहानुभूती मिळत आहे. हा खोटा प्रचार केला जात असून त्यावर विश्वास ठेवू नका. लोक आमच्याकडे पर्याय म्हणून पाहात असून त्यांच्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो आहे. असे आदेशही आम्हाला राज ठाकरेंनी आज दिल्याचे देशपांडेंनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून ते जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत त्यांनी अनेक विजय आणि पराभव ही पाहिले होते. पण ते कधी खचून रडले नाहीत. आता परवाच्या दिवशी पक्षप्रमुख रडत होते असे भास्कर जाधव म्हणाले. मात्र बाळासाहेब आणि राज ठाकरे कधी रडले नाही. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि विचार केवळ राज ठाकरेंकडेच असल्याचे ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी कधी सत्तेचं पद घेतलं नव्हत आणि आता जर जनता बाळासाहेबांची छबी जर कुणात पाहात असेल तर, ती राज साहेबांमध्येच, असेही देशपांडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.