Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : 'राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!'

Kalyan News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत.

शर्मिला वाळुंज

Raj Thackeray Birthday News : राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत.

राज ठाकरे यांचा आज (ता.१४) वाढदिवस आहे. त्या निमित्ताने बॅनर झळकले असून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवनिमित्ताने बॅनर लावले आहेत. यावरुन कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्यात मुख्यमंत्री कोणी असो...सत्ता कुणाची असो...राज यांना मात्र जनतेने मनातून प्रेम दिले आहे. त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे त्याचेच उदाहरण असल्याचे बोलले जाते. एक उत्तम वक्ता आणि जनतेच्या प्रश्नांना मांचावर मांडणारा नेता अशी राज यांची ओळख आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज 55 वा वाढदिवस असून त्यानिमित्त उल्हासनगरमध्ये मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" असा मजकूर छापण्यात आला आहे.

तसेच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील काटेरी सिंहासनावर बसलेला राज ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेचे कोणतेही प्रश्न असतील तरी ते प्रश्न शिवतीर्थ इथे गेल्यावरच सुटतात आणि नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळेच जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री हे राज ठाकरे हेच आहेत, अशा भावना यावेळी जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी व्यक्त केल्या.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT