Raj-Uddhav Thackeray Defeated : बहुचर्चित बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत ही निवडणूक लढली होती. या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल त्यांनी उतरवले होते. मात्र, शशांक राव यांच्या पॅनेलकडून त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. 21 पैकी एकही जागा ठाकरे बंधुंच्या पॅनलला जिंकता आली नाही. तर, शशांक राव यांनी तब्बल 14 जागा जिंकल्या तर, प्रसाद लाड यांच्या पॅनलने सात जागा जिंकल्या.
शशांक राव यांनी या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या विजयामागचे कारण सांगितले. ते म्हणाले, हा विजय आहे तो कामगारांचा आहे. मागील नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पतपेढीवर होती. शिवसेनेची पालिकेत सत्ता होती. 'बेस्ट'मध्ये अनेक वर्ष सत्ता होती. त्यांनी या काळात बेस्टचे खासगीकरण करून कामागारांच्या विरोधात काम केलं. त्या विरोधात कामगारांनी आपलं मत नोंदवलं.
ठाकरे बंधूंचे आव्हान तुमच्यासमोर होते तेव्हा ही निवडणूक कशी लढली या प्रश्नावर बोलताना शशांक राव म्हणाले, बेस्ट वर्कर युनियनही ही 1946 ची यूनियन आहे. या पूर्वी देखील आम्ही पतपेढीच्या निवडणुका लढल्या आहेत. आम्हाला निवडणुका लढण्याचा अनुभव आहे. शरद राव (रावसाहेब) यांचा पॅनल 2006 ते 2011 या काळात जिंकला होता. तसेच 2011 ते 2016 या कार्यकाळात देखील जिंकला होता.आम्ही नेहमीच या निवडणुका लढत आलो आहोत.
मागील नऊ वर्षात भ्रष्टाचार करण्यात आला. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चौकशी करणार तसेच त्याच्या दोषी अडथळले तर त्यांच्याकडून पैसा देखील वसूल करणार असे शशांक राव म्हणाले. तसेच 'बेस्ट'मध्ये स्वमालकीच्या तीन हजार गाड्या आल्या पाहिजेत, हे आमचं टार्गेट आहे. कामगारांना निवृत्त वेतन, ग्रॅज्युयटी मिळत नाही ती मिळाली पाहिजे तसेच बेस्ट अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करणे हे काही प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न राजकीय आहेत ते राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत. आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात ते सोडवले जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.