Best Employees Credit Society Election : 'बेस्ट पतपेढी'चा निकाल; अंजली दमानियांना झालाय खूप आनंद, कारण त्यांनीच सांगितलं!

Mumbai Best Employees Cooperative Credit Society Election Result Anjali Damania Reaction : मुंबईमधील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक निकालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी आनंद व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
Best Employees Credit Society Election
Best Employees Credit Society ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai credit society poll results : मुंबईमधील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅलनला भोपळा देखील फोडता आला नाही, तर भाजप महायुतीा सात जागांवर विजय मिळवता आला.

परंतु शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निकालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजल दमानिया यांना खूप आनंद झाला आहे. तसं त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचा पराभव झाला. आज सामान्य कामगार जिंकले याचा खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यांचा आता कुठच्याच पक्षावर विश्वास उरला नाही. ठाकरे हरले (0), आणि युती देखील हरली (7/21), असे म्हणत राजकीय पक्षांना फटकारलं आहे.

मुंबईतील (Mumbai) बेस्ट पतपेढीच्या निकालात कामगार नेते शशांक राव यांच्या दणदणीत विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. 14/21 जागा जिंकून तुम्ही पुन्हा कामगारांच्या योग्य हातात पतपेढी दिलीत, असे म्हणत अंजली दमानियांनी कामगारांच्या विवेकाचं कौतुक केलं आहे.

Best Employees Credit Society Election
Sangrambapu Bhandare controversy : तथाकथित महाराजांचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा, थोरातांच्या पथ्यावर; कीर्तनांना हजेरी लावण्याच्या सपाटा, सत्ताधारी-विरोधक पुरते घायाळ

दी बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पहिल्यादांच त्यांचा पॅनल निवडणुकीत एकत्र लढत होता. सुरवातीला निवडणुकाच्या मतमोजणीत ठाकरे बंधूंच्या युतीचा उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार आघाडी होते. यानंतर ठाकरे ब्रँडची समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली होती. परंतु सायंकाळी सर्व निकाल स्पष्ट होताच, ठाकरे युतीचे सर्वच उमेदवार पडले. नऊ वर्षांपासून या पतपेढीवर असलेले शिवसेना ठाकरेंचे वर्चस्व झटक्यात संपुष्टात आले.

Best Employees Credit Society Election
CM Rekha Gupta Attacked: CM रेखा गुप्ता यांना कानाखाली मारल्या; भाजपच्या दिल्लीतील जनता दरबारात हल्लेखोराचा गोंधळ

महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचे तगडे नेते मैदानात उतरून देखील दी बेस्ट पतपेढीचा सत्ता खेचून आणता आली नाही. त्यामुळे महायुतीच्या मर्यादांवर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.

परंतु या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. शंशाक राव यांच्या पॅनलने कामगारांना पर्याय उपलब्ध करून दिल्याने ठाकरे बंधूंची बेस्ट पतपेढीच्या निमित्ताने करून पाहात असलेली राजकीय लिटमस टेस्टच्या निकालानं धक्का बसला आहे. तर महायुतीला देखील हा निकाल धक्काच असल्याचे मानले जात आहे. ठाकरे बंधू या निकालानंतर आणखा कोणता राजकीय प्रयोग करणार आणि महायुती आगामी काळात कोणती रणनीती आखणार याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com