Raigad News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महामंडळाच्या अध्यक्षांची घोषणा केली होती. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चार महामंडळाची घोषणा करीत त्यांनी बाजी मारली होती.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोगावले यांची नियुक्ती केल्यामुळे ते पदभार स्वीकारतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते पदभार स्वीकारत नसल्याने वेगळ्या चर्चा रंगल्या असताना आता गोगावले यांनी पदभार स्वीकारत नसल्यामागचे खरे कारण सांगितले आहे. (Bharat Gogawale News)
गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर अद्याप हा पदभार स्वीकारलेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण पदभार स्वीकरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. अद्याप त्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यांनी हे पद स्वीकारले नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून भरत गोगावले यांनी सत्कार केला. त्याचा त्यांनी स्वीकार केला. यावेळी भरत गोगावले म्हणाले, 'मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. ते मी अद्याप घेतले नाही. त्यामुळे सर्व जण म्हणतात आता दिलंय ते घ्या.'
आदितीताईंच्या मंत्री पदात घुसवाघुसवी करू नका, असेही काही जण म्हणत आहेत. मात्र काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे अश्वासन गोगावले यांनी आदिती तटकरे यांना दिले. त्यासोबतच येत्या काळात आम्ही पुन्हा निवडून येऊ तेव्हा दोघेही मंत्री होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, 'मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हे पद दिले त्याला खूपच उशीर झाला आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आचारसंहितेला 15 ते 20 दिवसांचा कालावधी बाकी आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू. या चर्चेनंतरच पदभार स्वीकारायचा की नाही हे ठरवू.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.