Lata Mangeshkar  sarkarnama
मुंबई

लतादीदी आयुष्यभर अविवाहित राहिल्या कारण...

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांनी संगीत क्षेत्रात अनेक विक्रम केले असून 20 भाषेत सुमारे 30 हजार गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या याच अलौकिक कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून देशातील सर्वोच्च पुरस्काराने म्हणजे भारतरत्न (Bharatratna) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, लतादिदींच्या कारकिर्दीबद्दल जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय देखील निघतोच. एवढ सगळ असतांना दीदींनी लग्न का केले नाही. याबाबत अनेकदा प्रश्न पडतो. याबाबत दीदींनीच एका मुलाखतीत त्यांचे लग्न न करण्याचे कारण सांगितले होते. भाऊ-बहिणींच्या जबाबदारीमुळे आपण लग्न न केल्याचे त्यांनी सांगितले होते.(Lata Mangeshkar Passes Away)

दीदींना एका मुलाखतीत लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही भावंड लहान असतांना वडील दिनानाथ यांच निधन झाले होते. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आली. अशा परिस्थितीत मी लग्नाचा अनेकवेळा विचार करूनही तो विचार अमलात आणू शकला नाही. तो विचार केवळ विचारच राहिला. अगदी लहान वयापासून मी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी वाटल की, आधी सगळ्या लहान भावंडांना शिक्षण द्यावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करावे. त्यानंतर बहिणींची लग्न झाली. त्यांना मुल गेली. त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वेळ जात होता. त्यानंतर माझ्या लग्नाचा विचार मागे पडला. मी त्यांच्यातच गुंतून गेले, असे उत्तर लता दीदींनी दीले होते.

लतादीदींना लहानपणापासूनच मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतातच होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्याच होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली. त्यांच्यावर आपल्या तीन बहिणी तर भाऊ ह्द्यनाथ यांची जबाबदारी होती. त्यावर मात करून त्यांनी संगीत क्षेत्रात मोठा नावलौकीक मिळवला आहे. त्यांच्या याच योगदानाबद्दल भारत सरकारने देशाच्या सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT