लतादीदी म्हणाल्या होत्या, पुनर्जन्म मिळाला तर...

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले आहे.
Lata mangeshkar Passes Away
Lata mangeshkar Passes AwaySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता दीदींना (Lata Mangeshkar) कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. लतादीदींनी आपल्या संगीत कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले होते. तसेच, सर्वाधिक गाणे गाण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. मात्र, तरीही त्यांच्या मनात एका गोष्टीची खंत कायम राहिली होती. ती म्हणजे त्यांना पूर्णवेळ शास्त्रीय संगीत करता आले नसल्याची. त्यांनी याबाबतची खंत एका मुलाखतीत बोलूनही दाखवली होती. (Lata Mangeshkar Passes Away)

Lata mangeshkar Passes Away
अण्णा हजारे म्हणाले, भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले

लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30 हजार गाणे गाण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे शास्त्रीय संगीतावर प्रेम होते. मात्र, लहान वयातच कौटुंबिक जबाबदारी पडल्याने दीदींना पूर्णवेळ शास्त्रीय गायन करता आले नाही. ही खंत त्यांना कायम राहिली. याबाबत त्यांनी एका मुलाखती म्हटले होते की, पुनर्जन्म मिळाला तर मला शास्त्रीय संगीत गायला अधिक आवडेल. या जन्मात ही इच्छा अपूर्ण राहिली. कौटुंबिक जबाबदारींमुळे पार्श्वगायनातून बाहेर पडण्याचा विचार करू शकत नव्हते. शास्त्रीय संगीतासाठी वेळ देणे अशक्य असल्याने माझ्या आवडीला नाईलाजाने मुरड घालावी लागली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

लता मंगेशकर यांना संगीताचे बाळकडू हे आपल्या घरातूनच वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाले. ते प्रसिद्ध गायक, संगीकार होते. लतादिदींना आपल्या संगीत कारकिर्दीत तीन-चार गुरु लाभले. त्यामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर हे त्यांचे पहिले गुरु होते. त्यानंतर अमान अली खाँ भेंडीबाजारवाले, अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्याशिवाय, बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या एका शिष्याकडेही लता मंगेशकर शास्त्रीय संगीत शिकले आहेत. लतादीदींना संगीत क्षेत्रात पदार्पणाच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला होता.

Lata mangeshkar Passes Away
Lata Mangeshkar लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार

लतादीदींनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतातच होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली. त्यांच्यावर आपल्या तीन बहिणी तर भाऊ ह्द्यनाथ यांची जबाबदारी होती. त्यावर मात करून त्यांनी संगीत क्षेत्रात मोठा नावलौकीक मिळवला आहे. त्यांच्या याच योगदानाबद्दल भारत सरकारने देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com