Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav 
मुंबई

Bhaskar Jadhav : ठाकरेंची तोफ भास्कर जाधव विधानभवनाच्या पाऱ्यांवर नमस्कार करुन निघाले; पुन्हा येणार नाही?

सरकारनामा ब्युरो

Bhaskar Jadhav News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीर पणे उभे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विधानसभेत थेट अंगावर घेतले आहे. ठाकरे यांची बाजू विधानसभेत जोरदारपणे जाधव यांनी मांडली आहे. मात्र, आज तेच विधानसभा सोडून जात असल्याने त्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

महाविकास आघाडी सरकार असताना जाधव यांनी भाजपला अंगावर घेतले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर जाधव यांची तोफ अधिक त्वेशाने धडाडली. तर कोकणात सुद्धा माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेकांवर त्यांनी शाब्दीक बल्ले चढवले आहेत. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिंदे गटातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विधीमंडळात आक्रमक असणारे भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

याला कारणही म्हणजे, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलू न दिल्याने आणि कोणतीही लक्षवेधी न लावल्याने जाधव नाराज झाले. त्यांनी थेट विधानसभेच्या पाऱ्यांवर डोके टेकुन नमस्कार केला आणि निधून गेले. त्यामुळे ते आता पुन्हा विधानसभेत येणार की नाही, याची जोरदार चर्चा रंगली आहे.

यावेळी जाधव म्हणाले, ''मी अधिवेशनाचा एकही दिवस चूकवत नाही. मात्र, आता विधीमंडळात येण्याची माझी इच्छा राहिली नाही. मनाला अत्यंत वेदना होत आहेत. मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. मी नियमाने बोलण्याच प्रयत्न केला तरी माझी एकही लक्षवेधी लागली नाही. हे अत्यंत वेदनादायक आहे, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.''

राज्यातला शेतकरी आज संकटात आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. या संकटांमुळे खचलेले शेतकरी टोकाचे निर्णय घेऊन जीवन संपवत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. तसेच मला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचाही आरोप जाधव यांनी केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न मला विधीमंडळात मांडायचे आहे. मात्र, राज्य सरकारला संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही, असा निशाणा जाधव यांनी साधला. सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याचे सांगत ते निघून गेले. उद्या गुडी पाडव्याची सुट्टी असल्याने आणि पुढील काळात सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याचे सांगत जाधव यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांचे वाकून दर्शन घेतले आणि निघून गेले. त्यामुळे ते पुन्हा येणार की नाही, याची एकच चर्चा विधीमंडळ परिसरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT