Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा का काढली? भास्कर जाधवांनी सांगितलंं कारण

Bhaskar Jadhav | मुख्यमंत्री शिंदे -फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील बहुतांश नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे -फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) बहुतांश नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. परंतू माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचीही सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. यावरुन आता भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

''सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा व्यवसायिकाची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याआधी पोलिसांकडून एक आढावा घेतला जातो. तसा आढावा घेतला होता, जर आढावा घेतला तर तो फक्त विरोधकांचाच घेतला का? असे सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीच्याच नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला का, हा आढावा घेतला असला किंवा नसला तरी हा सर्व देखावा आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

''जाणीवपूर्क महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढुन टाकायची आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करायची, किंवा जर त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांची सुरक्षा काढून त्याला एकप्रकारे रान मोकळं करुन द्यायच जेणेकरून महाविकास सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तसेच त्यांच्या अपयशी कारभाराबाबत बोलू नयेत, दोन पक्षातील मतभेदांबाबत बोलू नयेत म्हणून ही सुरक्षा काढल्याचं असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

तसेच, आज मोठमोठे प्रकल्प गुजरात राज्यातच का जात आहेत. अतिवृष्टी ग्रस्त भागात राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करु शकत नाहीत, तरुणांच्या बेरोजगारीवर बोलू नयेत, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर विरोधकांनी बोलू नये, त्यांना एका भितीच्या छायेखाली ठेवायचं म्हणून राज्य सरकारने आमची सुरक्षा काढली, असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT