Devendra Fadnavis, Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis : भास्करराव जाधवांनी जखमेवरची खपली काढली; राणेंच्या विधानांवरून फडणवीसांना डिवचलं

Maharashtra Monsoon Session 2024 : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. गृह विभागाचा कारभार राज्यात रामभरोसे सुरू आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे भास्करराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील गृह विभागाच्या कारभार निराशाजनक आहे. राज्याचा कारभार हा रामभरोसे चालू आहे. राज्यात ड्रगसारखे प्रकरण आणि ड्रग निर्मितीचे कारखाने सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

"सत्ताधाऱ्यांचे लोक खुल्याआमपणे सांगत आहेत, तुम्ही काहीही करा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे", असे म्हणत भास्करराव जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुंबईतील वरळीमधील हिट अँड रन काय म्हटला प्रकरण हे अपघात नसून मर्डर असल्याचा आरोप भास्करराव जाधव (Bhaskarrao Jadhav) यांनी केला. या प्रकरणातील आरोपी 60 तास पोलिसांना मिळत नाही, यावरून त्यांनी थेट राज्यातील गृह विभागाच्या कारभारावर ताशोरे ओढले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

भास्कर जाधव म्हणाले, "गृह विभागाचा राज्यातील कारभार निराशाजनक आहे. राम भरोसे कारभाराचा प्रत्यय येतोय. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कोणालाही राहिला नाही. राज्यात दोन नंबरच्या धंद्यांना पेऊ फुटला आहे. राज्यात ड्रग प्रकरणे आणि ड्रग निर्मितीची कारखाने आहेत. हिट अँड रनची प्रकरणे महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत". दोन नंबरच्या धंद्यांना मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला आहे.

यातच सत्ताधाऱ्यांचे लोक खुलेआम पणे सांगत आहेत, तुम्ही काहीही करा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. तुम्ही नुसते फोन करा. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पोलिस तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. आम्ही जे बोलतोय त्याचे रेकॉर्डिंग पोलिस आपल्या घरी पत्नीला दाखवतील, अशा पद्धतीची भाषा या राज्यात वापरली जाते, असे म्हणत भास्करराव जाधव यांनी आमदार नितेश राणे यांच्या विधानाची आठवण करून दिली.

पोर्शे कार प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती?

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक उणिवासमोर आल्या, तरी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक कारवाई केल्याचे सांगितले. परंतु याच पोर्शे कार प्रकरणाचा दाखला आता इतर घटनांमध्ये पळवाट शोधण्यासाठी वापरला जात आहे. सत्ताधारी पक्षांमधील कोणाचा तरी हात असल्याचा संशय भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.

मुंबईतील वरळीमधील हिट अँड रन केस प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शाह 60 तास बेपत्ता होता. नेमका गेला होता कुठे? अशी शंका उपस्थितीत करून या पाठीमागे कुठेतरी सत्ताधारी पक्षांमधील कोणाचा तरी हात असल्याचा संशय भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT