Shivsena UBT News : भाजप सोडून आलेल्या राजू शिंदेंचा पक्षप्रवेश धडाक्यात,पण विधानसभा इच्छुकांमध्ये खदखद ?

Chhatrapati Sambhajinagar Politics : राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने या शिवसंकल्प मेळाव्याची चर्चा राज्यभरात झाली. आता याच प्रवेशावरून पक्षात नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.
Raju Shinde And Shivsena UBT
Raju Shinde And Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही माजी नगरसेवक आणि समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.

पश्चिम विधानसभा मतदारंघातून उमेदवारीचा शब्द मिळाल्याने राजू शिंदे यांनी भाजपमधील नेत्यांनी केलेली मनधरणी झुगारून शिवबंधन हाती बांधून घेतले. मात्र, गेल्या वर्षभरापासून पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या आणि काहींना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्यानंतर राजू शिंदे यांचा अचानक पक्षात प्रवेश झाल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शहरात शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याच्या मार्गावर अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने लक्ष वेधून घेतले होते. त्या उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीचे काम करून घेण्यासाठी आम्हाला दिलेला शब्द उद्धव ठाकरे पाळणार का? एकाच विधानसभा मदारसंघातून पाच-पाच लोकांना शब्द कसा दिला? यासह आणखी काही प्रश्न या बॅनरबाजीतून उपस्थित करण्यात आले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्यासाठी अनेक इच्छुकांना पक्षश्रेष्ठींनी कामाला लावले होते. पण संभाजीनगरात महायुतीने बाजी मारली आणि खैरे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. हा पराभव विसरून शिवसेनेने संभाजीनगरमधूनच आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने या शिवसंकल्प मेळाव्याची चर्चा राज्यभरात झाली. आता याच प्रवेशावरून पक्षात नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.

Raju Shinde And Shivsena UBT
Vasant More : वंचितला 'मनसे' निरोप देत 18 वर्षानंतर तात्या पुन्हा शिवसेनेतून डरकाळी फोडणार

विशेषतः पश्चिममधून निवडणूक लढवू इच्छिणारे ठाकरे गटाचे बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक मनोज गांगवे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून आमदार संजय शिरसाट यांच्यावर जाहीर टीका करणारे रमेश गायकवाड या प्रवेशाने नाराज असल्याचे बोलले जाते.

याशिवाय लोकसभेला पराभूत झालेले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पश्चिम मधून लढवण्यास इच्छुक होते. राजू शिंदे यांच्या प्रवेशाबद्दल त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेल्या भाषणात त्यांनी यायचंच होतं तर लोकसभेच्या आधी का आला नाही? असा सवालही केला होता. एकूणच राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पश्चिममधून इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

रमेश गायकवाड यांना उद्धव ठाकरे यांना उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांनी लोकसभेला चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग नोंदवला होता. शिंदे यांच्या प्रवेशानंतर आता हे इच्छुक काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Raju Shinde And Shivsena UBT
Aaditya Thackeray News : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरण म्हणजे खून; मुख्यमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांना निबंध..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com