Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

Leader of Opposition : विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचे नाव जाहीर; अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर!

Uddhav Thackeray PC : शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र वाटचाल सुरू राहील. विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी दिले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 04 March : महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २० जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार, हे निश्चित मानलं जात असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद मिळावं, अशी मागणी केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावर आता खुद्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shivsena UBT) २०, काँग्रेसला १६, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळालेल्या होत्या. या तीनही पक्षाच्या आमदारांची संख्या पन्नासच्या आतमध्येच आहे. मात्र, सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार असल्याचे संकेत महायुतीकडून मिळाल्यानंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विधानसभेत सर्वाधिक वीस जागा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, ते शिवसेनेला अडीच वर्षे मिळणार की संपूर्ण पाच वर्षे याबाबत चर्चा रंगली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाणार असे सूत्र महाविकास आघाडीत ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्या (NCP) मागणीमुळे विरोधी पक्षनेतेपदावरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.

शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र वाटचाल सुरू राहील. विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी दिले आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी ही विरोधी पक्षनेतेपदाची निवड व्हावी, अशी आमची मागणी आहे. लोकशाही मूल्यांचे पालन करून अध्यक्ष भास्कर जाधव यांचे नाव जाहीर करतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच अडीच वर्षांसाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही एकत्रिपणे पुढे जात आहोत. पुढे निवडणुका होत आहेत. त्या वेळी बघू, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

भास्कर जाधवांचे नाव असे पुढे आले

दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याच्या नावासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते केले जाईल,अशी चर्चा रंगली होती. आमदार भास्कर जाधव यांनी मध्यंतरी पक्षात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना उघडपणे बोलून दाखवली होती, त्यानंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा भास्कर जाधव यांच्याच खांद्यावर देण्याचे निश्चित झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT