Supreme Court On Shivsena : ठाकरे गटासह शिंदे गटाची धडधड वाढली, १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीची तारीख ठरली

Uddhav Thackeray Group Vs Eknath Shinde : शिवसेना नेमकी कुणाची ही लढाई अद्याप संपलेली नाही.
Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Supreme Court Hearing on Shivsena Name &LogoSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन गटात शिवसेना दुभंगली गेली होती. त्यानंतरचा दोन्ही गटातील कायदेशीर संघर्ष संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव, आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं. तर ठाकरे गटानं 16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी केली आहे. या दोन्ही निर्णयावर मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 10 ऑक्टोबरला तर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सोमवारी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाचा आदर करायला हवा होता अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकरांना खडेबोल सुनावले होते. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Supreme Court Hearing : सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले; ‘अपात्रता कारवाईबाबत किती वेळात निर्णय घेणार, त्याचं टाइम टेबल द्या’

शिवसेना नेमकी कुणाची ही लढाई अद्याप संपलेली नाही. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणे बाकी आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय पीठासमोर 18 सप्टेंबरला सुनावणी पार पडली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणीची तारीख समोर आली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 10 ऑक्टोबरला तर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं तर नाहीतर देशाचंही लक्ष लागलेले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पण अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सोमवार (18 सप्टेंबर) रोजी अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्याच मुद्द्यांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याच्या आतच कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले.

तर पुढील दोन आठवड्यांच्या आत अध्यक्ष कशाप्रकारे हे संपूर्ण प्रकरण हाताळतील. यासंदर्भातील तपशील न्यायालयाला द्यावी, असे देखील न्यालयालयाने निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने तारीख जाहीर केली. याप्रकरणावर पुढील सुनावणी ही 3 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Pankaja Munde News : ...म्हणून पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नये ! शेतकरी संघटनेचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com