MPSC Exam News
MPSC Exam News  sarkarnama
मुंबई

MPSC कडून मोठी घोषणा ; गट 'ब'आणि 'क' साठी मेगा भरती , सविस्तर वाचा !

सरकारनामा ब्युरो

MPSC Exam News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने विविध संवर्गांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (MPSC Exam News update)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आज (ता.२०) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गट ब आणि क संवर्गातील तब्बल आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.

एकूण पदे

  • पोलीस उपनिरीक्षक ३७४

  • दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक ४९

  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ०६

  • सहायक कक्ष अधिकारी ७०

  • राज्य कर निरीक्षक १५९

  • तांत्रिक सहायक ०१

  • कर सहायक ४६८

  • लिपिक टंकलेखक ७०३४

या आहेत महत्त्वाच्या तारखा..

  1. गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २ सप्टेंबर २०२३

  2. गट क संयुक्त मुख्य परीक्षा - ९ सप्टेंबर २०२३

  3. अर्ज करण्याची मुदत - १४ फेब्रुवारीपर्यंत

  4. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत - १४ फेब्रुवारी

  5. भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत - १६ फेब्रुवारी

  6. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत - १९ फेब्रुवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT