Eknath Shinde News : मोदींच्या सभेनंतर आघाडीला मोठा धक्का ; बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू

Narendra Modi News : मोदींच्या हस्ते विविध कामासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्ताने मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
Eknath Shinde, narendra modi
Eknath Shinde, narendra modisarkarnama

Eknath Shinde News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)काल (गुरुवारी) मुंबई दौऱ्यावर होते. मुंबईच्या बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींच्या हस्ते विविध कामासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्ताने मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

नरेंद्र मोदींच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, राज्यातील सत्तातरानंतर मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या शिवसेनेत सुरु झाली आहे. आज (शुक्रवारी) परभणीमध्ये महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडले आहे.

परभणी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सभापती आणि सदस्य हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. सईद खान यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे.

शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटातील आमदार, खासदारांसोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. इतकेच नाही तर विरोधी पक्षातील लोकंही शिंदे गटात सहभागी होत आहे.

Eknath Shinde, narendra modi
Deepak Sawant Car Accident : मोठी बातमी : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विदर्भातील विश्वासू, निष्ठावंत ओबीसी समाजाचे नेते रामेश्वर पवळ यांनी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, आता शिंदे गटाने आपला मोर्चा राज ठाकरे यांच्या मनसे नेत्यांकडे वळवलेला दिसत आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, "मुंबईच्या विकासाला गती देणार आहे. पहिल्यांदाच भारत मोठी स्वप्नं बघत असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी गरीबीची चर्चा आणि जगाकडून मदत मागणं यावरच वेळ घालवला. आज प्रत्येकाला वाटतंय की, भारत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे. डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे देशाचा विकास होत आहे,"

"डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर वेगानं विकासाला सुरूवात झाली. रेल्वे स्टेशन देखील आता विमानतळांसारखी होऊ लागली आहेत. मुंबईच्या विकासासाठी पैशाची कमी नाही. विकासाचा पैसा योग्य ठिकाणी लागला तर फायदा होईल. शहरात समर्पित प्रशासन असेल तरच विकास वेगानं होतो. विकासाच्या पैशातून भ्रष्टाचार झाला तर पैसा बँकेतच पडून राहतो, मग त्याचा उपयोग काय?," असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com