Mumbai News : भाजप नेते मोहित कंबोज हे कायमच त्यांच्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. तसेच ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, त्यांच्याविरोधात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापनानं फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच बँक ऑफ बडोदानेदेखील त्यांना कर्ज बुडवे घोषित करण्याची तयारी केली होती. याबरोबरच विविध प्रकरणात त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोपदेखील करण्यात आले होते.
पण त्यांना जुलै महिन्यात सर्व प्रकरणामधून 'क्लीन चिट' मिळाली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने कंबोज यांच्याविरोधातील फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याचा सीबीआयने दाखल केलेला अहवाल फेटाळला आहे. हा कंबोज यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरण बंद करण्याची शिफारस करण्यासाठी सीबीआयने दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप कंबोज यांच्यावर करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशेष न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत यादव यांनी सीबीआयकडून करण्यात आलेला तपास अपूर्ण असून, तो पुरेसा नसल्याची ठपका ठेवला. तसेच हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल फेटाळला. याचवेळी त्यांनी तपास यंत्रणांनी प्रकरणाचा पुढील तपास करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश देत सीबीआयला फटकारले आहे.
आरोपींनी गुन्हेगारी कट रचून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत होते. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेची अनुक्रमे नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून त्याचा दुरुपयोग केला, असे न्यायालयाने सीबीआयचा अहवाल फेटाळताना मुख्य महानगर दंडाधिकारी यादव यांनी सांगितले.
भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आले होते. भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. आता या प्रकरणात आता सीबीआय (CBI) कडून कंबोज भारतीय यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांपासून मोहित कंबोज यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. मात्र, आता त्यांच्याविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्यात आले होते. त्यांना सर्व प्रकरणांमधून क्लीन चिट मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या सर्व चौकशा आता संपल्या होत्या.
यासंबंधी मुंबई हायकोर्टाच्या(High Court) स्पेशल सीबीआयचा अहवालही सादर करून घेतला होता. मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या संबंधित बॅंकरनेही No Objection अर्ज दाखल केला होता. त्यामुळे कंबोज यांच्यावर आता कोणतीही केस नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.