Loksabha Election : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी प्रदेश भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली 'जनादेश यात्रा' काढण्यात आली होती. या यात्रेला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना (Shivsena) बहुमत मिळाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांनी आघाडीची साथ दिल्याने त्यांचे सरकार आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून 'जनादेश यात्रा' दोनचे आयोजन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. गेल्यावेळेस विधानसभेपूर्वी भाजपकडून (BJP) जनादेश दोन यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळेस लोकसभा निवडणुका आधीच यात्रेचे नियोजन केले जात आहे.
राज्यात काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मराठा आंदोलनाची धग कमी झाल्यानंतर या यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रदेश भाजपची यासाठीची बैठक दिवाळीनंतर होणार आहे. त्यामध्ये 'जनादेश यात्रे'बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा जानेवारीच्या शेवटी निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असणार आहे.
त्यासोबतच नागरिकांना येत्या काळात या माध्यमातून भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी केली जाणार आहे. 'जनादेश यात्रा' काढण्यात आल्याने गेल्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला होता. त्यामुळेच प्रदेश भाजपकडून या वेळेस ही 'जनादेश यात्रा' काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात याचा फायदा भाजपला कितपत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.