Mumbai : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामालाही लागले आहेत. तसेच राज्यात लवकरच महापालिका निवडणुकीचंही बिगूल वाजू शकतं. त्यामुळे राज्यातील राजकारण आगामी काळात तापण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. तर सदस्यांमध्ये विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे.
समन्वय समितीत माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यात आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली आहे. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.