Mumbai Politics : ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार केला असून, यात सहा बड्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ठाकरे गटाच्या नव्या कार्यकारिणीत आमदार अनिल परब, रवींद्र वायकर, खासदार राजन विचारे,अनिल देसाई, विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर, नव्या नियुक्तीत सोळा जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल, असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
पक्षातील फुटीनंतर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि पक्षवाढीला बळकटी देण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय पक्षाचे उपनेते आणि संघटक पदावरही नव्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाने दिली आहे. (Uddhav Thacekray News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विभागासाठी राजुल पटेल आणि शीतल देवरू, कल्याणमध्ये विजय साळवी, सोलापूर जिल्ह्यात शरद कोळी, कोल्हापूरमध्ये संजय पवार, परभणीत संजय जाधव यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर ठाकरे गटाच्या सचिवपदी साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, नाशिकमध्ये शुभांगी पाटील, कोकणात जान्हवी सावंत, साताऱ्यात छाया शिंदे, सोलापुरात अस्मिता गायकवाड, संभाजीनगरमध्ये चेतन कांबळे आणि मुंबईत विलास वाव्हळ, विलास रुपवते यांच्या संघटकपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.