MP Assembly Elections : उमेदवार यादी जाहीर होताच काँग्रेस अन् भाजपमध्ये बंडाचे वारे; वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

Assembly Elections News : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करताच निषेधाचे सूर उमटू लागले आहेत.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Madhya Pradesh Assembly Elections : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करताच निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. भिंड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे (BJP) भिंड जिल्ह्यातील लाहार मतदारसंघातून अंबरीश शर्मा यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रसाल सिंह यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला.

ग्वाल्हेर ग्रामीणमधून काँग्रेसच्या (Congress) तिकिटाचे दावेदार केदार सिंग कंसाना यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. भाजपने लाहार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. गोविंद सिंह यांच्या विरोधात भिंड जिल्ह्यातील रौन मतदारसंघाचे आमदार रसाल सिंग यांना उभे केले होते. निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांनी चुरशीची लढत दिली. या वेळी पुन्हा रसाल सिंग हे लाहारमधून भाजपच्या तिकिटाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, या वेळी पक्षाने त्यांच्या जागी अंबरिश शर्मा 'गुड्डू' यांना तिकीट देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

BJP, Congress
Eknath Shinde news : 'हे तर हिंदुत्वाचे मिलावट राम' ; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

रसाल सिंह यांनी लेहारमध्ये त्यांच्या समर्थकांची एक मोठी परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी अमरीश शर्मा यांच्या जागी अन्य कार्यकर्त्याला तिकीट देण्याची विनंती पक्ष हायकमांडला केली होती. तिकीट न बदलल्यास स्वतंत्रपणे निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. रविवारी रसाल सिंह यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषविलेल्या केदार कंसना यांनी उमेदवारांची यादी समोर येताच पक्ष सोडण्याची घोषणा केली. केदार हे ग्वाल्हेर ग्रामीणमधून दावेदार होते. त्यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावर (Social Media) राजीनामा जाहीर केला. काँग्रेसने ग्रामीण मतदारसंघातून साहेबसिंग गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे. केदार यांनी नंतर सांगितले निवडणुकीसाठी मोठी तयारी केली होती. 'सर्वेक्षणातही मी पुढे होतो, पण गेल्या निवडणुकीत पक्षाचा पराभव करणाऱ्यालाच पक्षाने तिकीट दिले.' मी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

Edited by : Amol Jaybhaye

BJP, Congress
Shrikant Shinde Vs Raju Patil : खासदार श्रीकांत शिंदेंचा आमदार राजू पाटलांना मोठा धक्का; कल्याणमध्ये मनसेला खिंडार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.