Aditya Thackeray And Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक आता होणार शिंदेंचे शिलेदार; मोर्चाच्या दिवशीच युवासेनेला मोठं खिंडार

Rahul Kanal Political News : शिंदेंच्या गटामध्ये सध्या इन्कमिंग जोरदारपणे सुरू आहे. तर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाला गटाला वारंवार धक्के दिले जात आहे. यातच आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल शनिवारी (दि.1 जुलै) रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल(Rahul Kanal) यांचा वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहुल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून ते बाहेर पडल्याची चर्चा आहे.

शिंदे फडणवीस सरकारला शुक्रवारी(दि.३०) एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतू, एक दिवस बाकी असला तरी शिंदेंच्या गटामध्ये सध्या इन्कमिंग सुरू आहे. तर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार असलेल्या मनिषा कायंदे(Manisha Kayande) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्याला काही दिवस उलटत नाही तोच कनाल हे देखील शिंदे गटात जाणार आहेत.

एकीकडे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात राहुल कनाल जाणार असून ठाकरेंना मोठा झटका बसणार आहे. दोन दिवसांपूर्वी राऊत कनाल यांनी सोशल मीडियावर ट्विटरवर नवीन सुरुवात करणार असल्याचे सूचक पोस्ट केली होती.

मनिषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश

ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी 18 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेने(Shivsena)त प्रवेश केला होता. यावेळी राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी आदित्य ठाकरे निकटवर्तीय व खंदे समर्थक असलेल्या राहुल कनाल हे शिंदे गटात प्रवेश करत असल्यानं ठाकरे गटाची गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं समोर आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT