Congress News: मोदींनी समान नागरी कायद्याचे संकेत देताच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; थेट नेमली समिती

Uniform Civil Code: सध्या समान नागरी कायद्याची मोठी चर्चा सुरू आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर विविध ठिकाणी 'मोदी@9' या अभियानांतर्गत मेळावे, सभा घेतल्या आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून भाजप आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचे संकेत दिल्यामुळे आता काँग्रेस अलर्ट झाली आहे. समान नागरी कायद्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नऊ जणांची अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून या समान नागरी कायद्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Congress News
BJP News: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 'मोदी@9' अभियान; आमदार अश्विनी जगतापांनी सांगितले भाजपच्या यशाचे गमक

समान नागरी कायदा लागू करण्याला काही विरोधी राजकीय पक्षांचा विरोध आहे. देशात विविध धर्म व जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माची आणि जातीची संस्कृती आणि कायदे आहेत. मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन यांचे पर्सनल लॉ आहेत. समान नागरी कायद्यामुळे या धर्मांना एकच कायदा लागू होणार असल्यामुळे या कायद्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

तर दक्षिण भारत, ईशान्य भारत तसेच आदिवासी समाजांमध्ये लग्न परंपरा आणि वारसा हक्काच्या परंपरा भिन्न आहेत. समान नागरी कायद्यामुळे या धर्मांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या समान नागरी कायद्यांच्या परिणामांबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Congress News
Congress News : कॉंग्रेसचे विदर्भातील ‘हे’ तीन नेते करणार समान नागरी कायद्याचा अभ्यास !

या समितीतील सदस्य यावर अभ्यास करून आपला अहवाल पक्षाला सादर करणार आहेत. या समितीमध्ये माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, वसंत पुरके, अनिस अहेमद, किशोर गजभिये, अमरजित मनहास, जेनेट डिसुझा, रवी जाधव यांचा या समितीत समावेश आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com