Mumbai News: सीबीआय तपास करत असलेल्या खंडणी प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे, तर गेल्या आठवड्यात मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळून लावला होता. खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरी अन्य खटल्यांमुळे सचिन वाझेला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून सचिन वाझेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात सचिन वाझेसह अजून काही जणांनी हॉटेल चालवण्यासाठी अग्रवाल यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप होता. याच प्रकरणात सचिन वाझेसह इतर काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता सत्र न्यायालयाने सचिन वाझेला दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
सचिन वाझेवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. यातील दोन प्रकरणाचा तपास 'सीबीआय' करत असून, एका प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. तसेच अँटिलिया प्रकरण अन् मनसुख हत्या प्रकरणाचा तपास 'एनआयए' करत आहे.
यातील दोन प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला आहे, तर एका प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयए कोर्टाने वाझेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.