congress leader sanjay nirupam Latest News Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी! काँग्रेसचे नेते निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.. नेमकं कारण काय?

sanjay Nirupam : कीर्तीकर हे निष्क्रीय खासदार असून त्यांनी पक्ष सोडला तसे पदही सोडावे...

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Nirupam News : काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम (Sanjay NIrupam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

निरुपम हे शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात बाईक रॅली काढणार होते. मात्र त्याआधीच त्यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्याची माहीती खुद्द निरूपमांनी ट्विटरवरून दिली आहे. (congress leader sanjay nirupam Latest News)

दरम्यान, खासदार कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. कीर्तिकरांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.१६ नोव्हेंबर) दुपारी बाईक रॅली काढण्यात येणार होती. मात्र या आधीच पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. तसेच त्यांना रॅली काढण्यापासून रोखलं आहे.

निरुपम याबाबत ट्वीटमध्ये म्हणाले की, "आमचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. कीर्तिकर यांच्यावर दबाव आणण्यासाठी मी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. आमच्या शांततापूर्ण रॅलीला परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले", अशी माहीती त्यांनी ट्विटरवरून दिली.

दरम्यान, ''कीर्तीकर हे निष्क्रीय खासदार आहेत. त्यांनी पक्ष सोडला तसे पदही सोडावे, या मागणीसाठी आम्ही रॅली काढणार होतो, पण त्याआधीच पोलिसांनी आम्हाला रोखलं व मला ताब्यात घेतलं'', असंही निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT